किरगीझिया
किरगीझिया : सोव्हिएट संघराज्याच्या पंधरा राज्यांपैकी मध्य आशियातील एक राज्य. क्षेत्रफळ १,९८,५०० चौ.किमी., लोकसंख्या ३१,००,००० (१९७२) राज्याच्या वायव्येस व उत्तरेस कझाकस्तान, पूर्वेकडे व आग्नेयीकडे चीन, दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे ताजिकिस्तान आणि पश्चिमेकडे उझबेकिस्तान संघराज्य असून फ्रुंझ (लोकसंख्या ४,५२,०००) ही राज्याची राजधानी आहे.